जग बदलण्याचे स्वप्न पहाणाऱ्या कल्पनांचा सेतु अर्थात समर्थ भारत व्यासपीठ

गेली बारा वर्षे समर्थ भारत व्यासपीठ हि संस्था भारतातील मुंबई नजिक असलेल्या ठाणे शहरात काम करीत आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा पॅटर्न संस्थेने उभा केला, अकुशल नाका कामगारांना कौशल्याधारित करण्यासाठीचा नाका शाळा संस्थेने सुरू केला, ठाणे शहरातील वार्षिक ३ हजार टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून कोळसा तयार केला जात आहे, वर्षाकाठी २ हजार टन निर्माल्यावर प्रक्रिया आज केली जात आहे. आपल्या ५० बचतगटांच्या माध्यमातून ५०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य आणण्याचे काम संस्था करीत आहे.
सर्वेन सुखिनः संतू सर्वे संतू निरामया
जग बदलण्याच्या प्रवासाची सुरवात
सिग्नल शाळा, नाकाशाळा, महानिर्माल्य अभियान, प्रकल्प पुनर्निर्माण या अशा कल्पना की ज्यांनी जग बदलायचे स्वप्न पहिले. मूलभूत चैतन्याशी तादात्म्य झाल्याने समर्थ भारत व्यासपीठाच्या चमुला सुचलेल्या या कल्पना आहेत.
रस्त्यावरील भिक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे हिच केवळ सिग्नल शाळेची उपलब्धी नसून “सर्वेन सुखिनः संतू सर्वे संतू निरामया” या मूलभूत विचाराचा तो अविष्कार आहे. लोकांच्या घराचे स्वप्न साकारणारे स्वतः मात्र बेघर विस्थापित जगणारे अशा अकुशल बांधकाम मजुरांना कौशल्याधारित करण्याची अभिनव कल्पना नाकाशाळा अर्थात प्रकल्प निर्माणामागे आहे. अवघे विश्व हे पृथ्वी, आप, तेज, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी साकारलेले असताना त्या साखळीचा भेद करत निर्माल्याची अशास्त्रीय विल्हेवाट थांबवून निर्माल्याचे खतरूपी मातीत रूपांतर करण्याची कल्पना महानिर्माल्य अभियानातून साकारली गेली.
गेली बारा वर्षे समर्थ भारत व्यासपीठ हि संस्था भारतातील मुंबई नजिक असलेल्या ठाणे शहरात काम करीत आहे. सिग्नल शाळेच्या माध्यमातून भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा पॅटर्न संस्थेने उभा केला, अकुशल नाका कामगारांना कौशल्याधारित करण्यासाठीचा नाका शाळा संस्थेने सुरू केला, ठाणे शहरातील वार्षिक ३ हजार टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून कोळसा तयार केला जात आहे, वर्षाकाठी २ हजार टन निर्माल्यावर प्रक्रिया आज केली जात आहे. आपल्या ५० बचतगटांच्या माध्यमातून ५०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य आणण्याचे काम संस्था करीत आहे.
प्रयत्नांना मिळालेली मान्यता
समर्थ भारत व्यासपीठाचे पाच प्रकल्प आज ठाणे शहरात सुरु आहेत हे सगळेच प्रकल्प ठाणे महानगरपालिकेशी संलग्न आहेत, सामाजिक संस्था म्हणून वेगळी चूल न मांडता लोकशाही व्यवस्थेचे अस्तित्व ठसठशीतपणे मान्य करणे आणि आहे त्या व्यवस्थेला अधिक रचनात्मक रूप देण्याचे काम समर्थ भारत व्यासपीठ करत आहे.
शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त आहेत. चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता व वेळ आज त्यांच्याकडे नाही. अशा वेळेस कोणीतरी हे काम करायला हवं. हेच काम समर्थ भारत व्यासपीठ करत असून आज व्यासपीठाचे सगळे प्रकल्प राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर मॉडेल प्रकल्प म्हणून उभे राहत आहेत.
समर्थ भारत व्यासपीठाच्या निर्माल्य प्रकल्पाचा पॅटर्न नाशिक उज्जैन येथील कुंभमेळ्यात तसेच महाराष्ट्रातील बारा ज्योतिलिंग येथे निर्माल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वीकारला गेला. सिग्नल शाळा प्रकल्पाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी रस्त्यावरील विद्यार्थ्यांना मुख्य धारेतील शिक्षण प्रवाहात आणण्याचे मॉडेल म्हणून अधिवेशनात जाहीर केले, निर्माल्य व हरित कचरा व्यवस्थापनाला राष्ट्रीय स्तरावरील स्कॉच गुड गर्व्हनन्स पुरस्कार मिळाला

Mission
समर्थ भारत व्यासपीठ हे समाजातील वंचित, विशेषतः कचरा वेचक महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. त्यांना सन्माननीय रोजगाराच्या संधी देणे, आत्मसन्मानाची जाणीव करून देणे आणि त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर उंचावणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Vision
एक सक्षम, आत्मनिर्भर आणि सशक्त भारत घडवणे, जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळेल, आणि कुठल्याही प्रकारच्या सामाजिक भेदभावाशिवाय प्रत्येकाला संधी उपलब्ध होईल. समर्थ भारत व्यासपीठ अशा समाजाचे स्वप्न पाहते, जिथे कचरा वेचक महिलाही अभिमानाने आपले जीवन जगतील.
Values
- समानता
- आत्मनिर्भरता
- सहकार्य आणि सहभाग
- सामाजिक न्याय
- सतत प्रगती
त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे!
आत्तापर्यंत, आम्ही अनेक कचरावेचक महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणले आहे, त्यांना सन्मानजनक रोजगार, कौशल्य प्रशिक्षण आणि त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत — आणि हे शक्य झाले आहे तुमच्यासारख्या दयाळू व्यक्तींच्या समर्थनामुळे.