






प्रकल्प पुनर्निर्माण पुनर्निर्माणाचे उत्तरदायित्व
ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ यांनी महिला कचरावेचक, कचऱ्याचे वर्गीकरण करून उदरनिर्वाहासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या व्यक्तींच्या पुनर्वसनाचा अभिनव उपक्रम कार्यान्वित केला आहे. यापैकी अनेक महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक असुरक्षितता, आरोग्य समस्या आणि सामाजिक कलंक यासह महत्त्वपूर्ण आव्हानांचा सामना करावा लागतो.
कचरावेचक व सफाईसेवक केवळ चतुर्थश्रेणी कामगार राहिले आहेत. यापलिकडे त्यांच्या जगण्याच्या व्याख्येत काहीही बदल झाला नाही. सगळे पुर्नप्रक्रिया करणारे उदयोजक व तथाकथीत भंगारवाले करोडपती झाले पण सफाईकामगार व कचरावेचकांचे पुनर्निर्माण ख-या अर्थाने झालेच नाही.
सिग्नल शाळा नव्या युगाचे पसायदान
ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांनी ठाण्यातील तीन हात नाका पुलाखाली सिग्नल शाळा हा अभिनव उपक्रम सुरु केला. जवळपास वीस ते बावीस वर्षांपासून सिग्नलवर पुलाखाली विस्तापित आयुष्य जगत असलेल्या कुटूंबातील 46 मुले आज मुख्य धारेतील शिक्षण घेत आहेत.
पिढ्यान्पिढ्यावर केला जाणारा सामाजिक अन्याय आहे. मूळात शळाबाह्य मूलांचा प्रश्नच मान्य करायचा नाही म्हणजे सोडवण्याची जबाबदारीच येत नाही या वृत्तीने याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आहे. आज सिग्नल शाळा सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजू घेऊन उभी आहे.
वस्ती विकास प्रकल्प पुनर्निर्माणाचे उत्तरदायित्व
समर्थ भारत व्यासपीठ संचालित वस्ती विकास प्रकल्पाअंतर्गत वागळे वसाहतीत डोंगर उतारावर अत्यंत दाटीवाटीने एकमेकावर छोटी छोटी घरे असलेल्या, अरुंद सेवा वस्त्यां मध्ये, जिथे आरोग्याच्या मूलभूत सुविधांची कमतरता आहे, मुलांना शाळेत न पाठविता पोटासाठी कामावर पाठविले जाते, दिवसभर मुले घाणीत अर्वाच्य भाषेत बोलत खेळत असतात, व्यसनांचा सर्रास उपलब्धता आहे अश्या वस्त्यांमध्ये मुलांवर अभ्यासिका, संस्कार वर्ग, किशोर वयीन विकास वर्ग, युवा विकास वर्ग, आरोग्य सेवा द्वारा चांगले संस्कार, सुदृढ आरोग्य, अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून भारताचे चांगले नागरिक करण्याचा प्रयत्न केला जातो. सध्या चाळीस सेवा वस्त्यांमध्ये सेवा प्रकल्प असून एकूण ८२० विद्यार्थी लाभ घेत आहेत.
सामाजिक-आर्थिक असमानतेला आव्हान देऊन त्यावर मात करणे, समाजातील असुरक्षित घटकांना स्वावलंबनाच्या ध्येयाकडे घेऊन जाणे व सक्षम करणे. प्रत्येक विद्यार्थ्याला वेगाने बदलणाऱ्या जगात यशस्वी होण्यासाठी अनूकुल वातावरण निर्माण करणे. निरक्षरता, अज्ञान व व्यसनाधीनता यांच्याशी लढा देण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रतिबंध करुन विकासाचे अंतिम उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यार्थी, तरुण, युवती व महिलांचे संघटन निर्माण करुन लोकशक्ती एकत्रित करणे. भारतीय संस्कृती जतन करुन सर्व समाज एकरस व समरस होऊन भारतभुमीला पुन्हा परम वैभव प्राप्त व्हावे हा प्रामाणिक हेतू घेऊन संस्था कार्यरत आहे.
जग बदलण्याचे स्वप्न पहाणाऱ्या कल्पनांचा सेतु अर्थात समर्थ भारत व्यासपीठ
समर्थ भारत व्यासपीठाचे पाच प्रकल्प आज ठाणे शहरात सुरु आहेत हे सगळेच प्रकल्प ठाणे महानगरपालिकेशी संलग्न आहेत, सामाजिक संस्था म्हणून वेगळी चूल न मांडता लोकशाही व्यवस्थेचे अस्तित्व ठसठशीतपणे मान्य करणे आणि आहे त्या व्यवस्थेला अधिक रचनात्मक रूप देण्याचे काम समर्थ भारत व्यासपीठ करत आहे.
शासकीय पातळीवर अधिकारी व कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्यस्त आहेत. चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता व वेळ आज त्यांच्याकडे नाही.
कचरावेचक महिलांचे सक्षमीकरण
भिक्षेकरी मुलांना मुख्य शिक्षण धारेत आणले
सुका कचरा महिन्याभरात जमा
घरांचा सहभाग
आता पर्यंत काय कामं झाले आहेत
गेली बारा वर्षे समर्थ भारत व्यासपीठ हि संस्था भारतातील मुंबई नजिक असलेल्या ठाणे शहरात काम करीत आहे.
सिग्नल शाळेच्या माध्यमातून भीक्षेकरी मुलांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा पॅटर्न संस्थेने उभा केला, अकुशल नाका कामगारांना कौशल्याधारित करण्यासाठीचा नाका शाळा संस्थेने सुरू केला, ठाणे शहरातील वार्षिक ३ हजार टन हरित कचऱ्यावर प्रक्रिया करून कोळसा तयार केला जात आहे, वर्षाकाठी २ हजार टन निर्माल्यावर प्रक्रिया आज केली जात आहे.
आपल्या ५० बचतगटांच्या माध्यमातून ५०० आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या जीवनात आर्थिक स्वातंत्र्य आणण्याचे काम संस्था करीत आहे.
Documentary
Our Supporters






त्यांना तुमच्या मदतीची आवश्यकता आहे!
सिग्नल शाळेतील मुले शिक्षण आणि कौशल्य विकासाद्वारे एक चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक अडचणींचा सामना करत असतानाही, त्या शिकण्याची आणि वाढण्याची निर्धार करत आहेत, ते कुठल्याही प्रकारच्या व्यावसायिक प्रशिक्षण, भाषा कौशल्य किंवा अतिरिक्त क्रियाकलापांद्वारे असो. तथापि, त्यांच्या प्रवासाला पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांना तुमच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. तुमचा योगदान त्यांना यशस्वी होण्यासाठी आवश्यक संसाधने, संधी आणि मार्गदर्शन प्रदान करण्यास मदत करू शकतो.
त्यांच्या जीवनात फरक करण्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्यासोबत सामील व्हा!